फुलांच्या हारावर चूळ भरणारा गरीब मुलगा: खोट्या दाव्यासह व्हायरल होतोय व्हिडीओ





    परदेशातील कुठलातरी व्हिडीओ उचलायचा आणि भारतात खोट्या दाव्यासह पसरवायचा ही भारतातल्या धर्मांध लोकांची जुनी खोड आहे. खाली असाच एक व्हिडीओ दिला आहे. या व्हिडीओमध्ये मळकटलेल्या कपड्यातील एक मुलगा हातात फुलांचा छोटा हार/गजरा घेऊन बसलेला दिसत आहे. तो मुलगा ग्लासातील पाणी तोंडात घेऊन त्याने हातातील फुलांच्या गजय्रावर चूळ\भरत आहे. व्हिडीओमध्ये त्या मुलाने असे दोन वेळा केल्याचे दिसत आहे. सदर व्हिडीओबाबत खोटा दावा करणारी पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. ती पोस्ट तुम्हीच वाचा. आणि त्यानंतर त्याबाबतची सत्यताही वाचा.




 घ्याल का परत सिग्नल वर विकत असलेले देवाचे छोटे छोटे हार..!

😡

गरीब समजून आपण यांना मदत करायला जातो आणि हे असे नीच लोक निघतात.

हे सर्व कट्टर मुस्लिम आहेत. त्यांना मदरसा मध्ये प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्यात कधीच बदल होणार नाही.

या व्हिडिओ मुळे निदान अंध हिंदू सुधारला तरी खूप बरे वाटेल.

🤷‍♂️


या व्हिडीओची सत्यता अशी आहे.

या व्हीडीओ मध्ये पाठीमागे दिसणार्‍या कारचा नंबर AQV 503 असा आहे. तो पाकिस्तानमधील आहे. हा व्हीडीओ पाकिस्तान मधील आली शाह याने ३१-०८-२०२४ रोजी 'बकरा मेला' या फेसबूक पेजवर टाकला. 'और पाओ गजरे, ऐसे करते है फुलोंवाले गजरे फ्रेश' असे शीर्षक या व्हीडीओला दिले आहे. 

म्हणजे व्हीडीओ पाकिस्तानातला, त्यातील पात्रे पाकीस्तांनातली, तो पोस्ट केलाय एका पाकिस्तानी माणसाने विनोदाने.

आणि 

आमच्याकडचे विकृत, नीच धर्मांध त्याचा उपयोग हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवायला करीत आहेत.

आमच्याकडे भैया लोट्यामध्ये लघवी करून तोच लोटा पाणीपुरीसाठी वापरतो, तेव्हा मात्र हे धर्मांध लोक गप्प बसतात, कारण भैय्या मुसलमान नसतो ना.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने