“भारतात ब्राह्मण असणे चांगले की वाईट....?” हा लेख स्वतः मराठा जातीचे असल्याचा दावा करणारे अवधूत मोहिते, बी.टेक (सिव्हिल इंजिनीअरिंग) यांनी लिहिलेला आहे आणि तो सोशल मीडियामध्ये फिरत आहे. त्यांच्या पोस्टला उत्तम जोगदंड यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी उत्तर देताना उत्तर मोहिते यांच्या एक/अनेक परिच्छेदांखाली कंसात उत्तर दिले आहे:-
मी ब्राह्मण नाही,मी मराठा आहे पण मला वाटते की मी माझ्या गेल्या काही वर्षांच्या निरीक्षणावर आधारित माझं मत निश्चित देऊ शकतो !!!
उत्तर:
(मोहिते यांच्या म्हणण्यांनुसार ब्राह्मणांना “स्वतःची तीव्र बुद्धिमत्ता” असतांना स्वतःच्या बचावासाठी मात्र एका मराठा जातीच्या माणसाची साक्ष ब्राह्मणांना का काढावी लागते? परशुरामाने पृथ्वी २१ वेळा निःक्षत्रीय केल्याने ज्या मराठ्यांना ब्राह्मण शूद्रच मानते, ज्या खोले बाईंनी त्यांना त्यांची जात दाखवून दिली आहे, असा कोणी मराठा हे लिहू शकत नाही. थोडक्यात, हे बी. टेक. झालेले अवधूत मोहिते ज्या पद्धतीने ब्राह्मणांची भलावण करीत आहेत हे पाहता कोणीतरी कट्टर ब्राह्मणाने मराठा जातीचा बुरखा पांघरून हे लिहिले आहे असे दिसते.)
आजच्या भारतात ब्राह्मण असणे म्हणजे १९३० च्या जर्मनीतील ज्यू होण्यासारखे आहे !!!
ज्यू हे जर्मनीच्या लोकसंख्येच्या अगदी नगण्य होते तरी जर्मन समाजाच्या सर्व समस्यांसाठी त्यांना दोषी ठरवले गेले !!!
आज भारतात तेच घडत आहे !!!
उत्तर:
(ब्राह्मणांची तुलना ज्यू लोकांशी करणे पूर्णतः तर्कविसंगत आणि मूर्खपणाचे आहे. ज्यू लोकांनी जर्मनीत जातींची उतरंड निर्माण करून, अस्पृश्यता आणून जर्मनीत माणुसकीला काळिमा फासणारे वर्तन केल्याचे ऐकिवात नाही, जे ब्राह्मणांनी इथे केले. भारतात जर्मनीसारखे काहीही घडत नाहीये. ब्राह्मण लोकांनी आपले ब्राह्मण्य, जातीय वर्चस्व सोडून, त्यांनीच धार्मिक आधारावर निर्मिलेल्या जाती-अस्पृश्यता नष्ट करून मानवी मूल्ये भारतात स्थापित करावीत ही सर्वांची अपेक्षा असताना ते आजही मनुस्मृतीआधारित राज्य आणू पाहताहेत म्हणून त्यांच्या विरोधात बोलले जाते. परंतु, मानवी मूल्ये स्थापित करण्याची मागणी करणार्या बहुजनांना स्वतःच हिटलरी प्रवृत्तीचे असणारे ब्राह्मण लोक थेट हिटलरच्या रांगेत बसवू पाहताहेत, केवढे हे अधःपतन!)
सर्व समस्यांसाठी ब्राह्मणांना बळीचा बकरा बनवले जात आहे, लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत अल्प टक्के असूनही !!!
उत्तर :
(लोकांना गुलाम बनवण्यासाठी बहुसंख्यक असणे गरजेचे नाही. एक सडलेला आंबा टोपलीतले सगळे आंबे सडवतो. करोडो लोकांना देवा धर्माचे भय घालून मानसिक गुलाम बनवणारे अल्प-टक्के आहेत की बहु-टक्के आहे हा मुद्दाच होऊ शकत नाही. राजा हा एकटाच असतो, परंतु तो आपल्या गुलाम असलेल्या प्रजेवर राज्य करतोच ना?)
ब्राह्मणही श्रीमंत किंवा शक्तिशाली नसतात.त्यातले बहुतेक सर्वांसारखे मध्यमवर्गीय आहेत आणि बरेचसे गरीब पुजारी आहेत जे लग्ना,पूजा या सारखे धार्मिक विधी करून आपला उदरनिर्वाह करतात !!!
उत्तर:
(शक्तीपेक्षा युक्ति श्रेष्ठ असे म्हणतात. धार्मिक विधीच्या नावाखाली जन्माच्या आधीपासून ते मृत्यूनंतर देखील ब्राह्मण लोक गरीब शुद्रांना निर्लज्जपणे कसे नागवतात आणि स्वतःची धन कशी करून घेतात हे म. फुले यांनी सोदाहरण दाखवून दिले आहे. शिवराज्याभिषेकात छत्रपती शिवाजी महाराजांचा खजिना यांनी कसा रिकामा केला याची माहिती उपलब्ध आहे. आजही परंपरागत सारे विधी, काही शतकांपूर्वी आलेली सत्यनारायण पुजा, गृहशांती या नावाने तसेच वास्तुशास्त्र, ज्योतिष, नारायण नागबळी इत्यादीच्या नावाने जनतेला लुबाडणारे ब्राह्मण जर स्वतःला गरीब समजत असतील तर यासारखा मोठा विनोद नाही.)
ब्राह्मणांना कोणतेही आरक्षण नाही किंवा त्यांना सरकारकडून कोणतेही विशेषअनुदान दिले जात नाही !!! तरीही प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनाच दोष दिला जातो !!!
उत्तर :
(अल्प-टक्के असलेल्या ब्राह्मण लोकांना-कथित वरच्या जातींना खरे तर १०० टक्के आरक्षण कित्येक शतकांपासून होते. भारत एक स्वतंत्र देश म्हणून अस्तीत्वात आल्यानंतर आरक्षण नीती आल्याने त्या १०० टक्के आरक्षणापैकी केवळ २२.५ टक्के आरक्षण काढून घेऊन अनुसूचीत जाती-जमातींना देण्यात आले. मंडल आयोगानंतर २७ टक्के शूद्रांसाठी काढून घेण्यात आले. तरीही उर्वरित ५०.५ आरक्षण अल्प-टक्के ब्राह्मण - कथित वरच्या जातींना उपलब्ध असताना आरक्षणाच्या नावाने रडावे हे पटत आणि पचत नाही. शतकानुशतके बहुजनांचे शोषण करून समृद्ध झालेल्या ब्राह्मणांना विशेष अनुदानाची गरज भासणे म्हणजे नीता अंबानीने लाडकी बहीण योजनेत महीना १५०० रुपये मिळण्याची अपेक्षा करण्यासारखे आहे.)
कम्युनिस्ट,इस्लामिक कट्टरपंथी आणि सर्व हिंदू विरोधी गट सतत ब्राह्मणांचा तिरस्कार करत आहेत !!!
त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी बळीचा बकरा बनवले जात आहे जसे ज्युं ना जर्मनीत बनवले गेले होते !!!.
उत्तर:
(खरे तर जे हिटलरने ज्यू लोकांविरुद्ध केले, तेच ब्राह्मणी व्यवस्थाच इथे सलोख्याने राहणार्या जाती-जातीत, धर्मा-धर्मात तिरस्कार, तेढ निर्माण करून, करत आहे. कम्युनिस्ट चळवळ भारतात तरी ब्राह्मण नेत्यांनीच आणली आणि वाढवली. आपले ब्राह्मण बांधव या चळवळीकडे का वळले त्याबद्दल ब्राह्मणांनी चिंतन करावे. ब्राह्मण समाजाला हिंदू धर्मातीलच बहुजन समाजाचे सुज्ञ लोक विरोध करतात, तिरस्कार नव्हे. तो यासाठी की ब्राह्मणांनी आपले मानवी मूल्यांना पायदळी तुडवणारे वर्तन सोडावे म्हणून. मुसलमानांचा तिरस्कार तर ब्राह्मण लोकच करतात. संघाची स्थापना तर त्याचसाठी झाली की काय असे वाटते. लव्ह जिहाद, थूक जिहाद, मॉब लिंचिंग, बुलडोजर संस्कृती, बहिष्कार आणि कसले कसले प्रकार कोण आणत आहे? दुसर्या जाती धर्मांना बळीचा बकरा बनवणारे ब्राह्मण जेव्हा स्वतः बळीचा बकरा होत असल्याची आरोळी ठोकतात तेव्हा तो ही अजून एक मोठा विनोद वाटतो.)
केरळमधील ब्राह्मण आदि शंकराचार्य यांनी आपल्या तीव्र इच्छाशक्तीने,बुद्धिमत्तेने आणि वादविवाद शक्तीने वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले !!!
उत्तर:
(ब्राह्मण लोकांचा धर्म हा हिंदू नसून वैदिक धर्म आहे हे कबूल केल्याबद्दल मोहिते यांचे आभार. त्यामुळे या लेखात जिथे जिथे हिंदू हा उल्लेख आलेला आहे तो मतलबी स्वरूपाचा आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे. शंकराचार्य यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करताना त्यांच्या बुद्धिमत्ता किंवा वादविवाद शक्तिपेक्षा बौद्ध भिक्कू यांच्यामध्ये सततच्या राजाश्रयामुळे आलेल्या आळसाचा आणि बुद्धी-मांद्याचा भाग आहे, तसेच पुष्यमित्र शुंगाने पूर्वीच केलेल्या बौद्धांच्या पद्धतशीर शिरकाणाचा भाग आहे. याशिवाय, त्यांनी बौद्ध धर्माला शह देण्यासाठी बौद्ध धर्मातील अहिंसेचे तत्व चोरले आणि वैदिक धर्मात घुसवले, ज्या योगे यज्ञात गाय बळी देण्याची प्रथा बंद झाली आणि गाय अति पवित्र अशी माता मानली जाऊ लागली. असे म्हणतात की त्यांनी बौद्ध धर्मातील तत्त्व उचलले हे वैदिक धर्मातील ब्राह्मणांना मान्य नव्हते.)
वेद,उपनिषद,ब्रह्मसूत्रे,भगवद्गीता या ज्ञानाचे जतन आणि संवर्धन करणारे ब्राह्मणच होते,त्यांनीच इस्लामिक आक्रमक आणि ब्रिटिश वसाहतवाद्यांच्या १००० वर्षांच्या गुलामगिरीत सुद्धा संस्कृत भाषा जिवंत ठेवली (आणि अजूनही ठेवली आहे)!!! ज्या समर्थ्यवान व्यक्तीने मराठा साम्राज्याचा प्रसार केला आणि मुघल साम्राज्याचा नाश केला तो ब्राह्मणच ( बाजीराव पेशवा ) होता !!!
ब्राह्मणच आपल्याला प्राचीन वैदिक संस्कृतीशी जोडणारा दुवा आहेत !!!
ब्राह्मण नसते तर पर्शियन,ग्रीक, इजिप्शियन,रोमन आणि इतर अनेक मृत संस्कृतींप्रमाणे वैदिक संस्कृती सुद्धा कधीच नष्ट झाली असती !!!
आपला धर्म वाचवण्यासाठी सर्व जातीचे हिंदू लढले,पण वैदिक धर्माचे मूळ ग्रंथ आणि परंपरा वाचवणारे ब्राह्मणच होते !!!
उत्तर:
(आपला धर्म वाचविण्यासाठी सर्व जातीचे हिंदू लढले (म्हणजे, ब्राह्मण लढले नाहीत) हे कबूल केल्याबद्दल लेखकाचे आभार. वेद,उपनिषद,ब्रह्मसूत्रे,भगवद्गीता या तथाकथित ज्ञानाचे आणि संस्कृत भाषेचे जतन ब्राह्मणांनी जरूर केले असेल परंतु संवर्धन केले असे म्हणणे धादांत खोटे आहे. कारण हे तथाकथित ज्ञान वगैरे शिकणे आणि शिकवणे याचा अधिकार अत्यंत अल्प-टक्के ब्राह्मण लोकांकडेच होता. बहुजन (शूद्र, अतिशुद्र) यांना शिकायला बंदी होती, नव्हे तसा प्रयत्न शुद्राने करणे हा अपराध होता. शुद्राने वेद नुसते ऐकले तरी त्याच्या कानात तप्त शिसे ओतले जायचे. पेशव्यांच्या काळात तर अस्पृश्य लोकांच्या पाठीमागे झाडू आणि गळ्यात मडके लटकत होते. संस्कृत भाषा जीवंत ठेवण्याच्या बढाया हे बुद्धिमत्ता असलेले लोक मारतात पण देशातील एक खेडे वगळता ती कुठेही बोलली जात नाही. आणि, इस्लामिक आक्रमक आणि ब्रिटिश वसाहतवाद्यांच्या काळात हे ब्राह्मण काय होम-हवन करण्यात व्यस्त होते काय? खरे तर या दोन्ही सत्तांची चाकरी करण्यात या लोकांनी धन्यता मानली. मराठा साम्राज्याचा प्रसार आणि मुघल साम्राज्याचा नाश केल्याचे श्रेय बाजीराव पेशवा यास देतांना या मराठा जातीच्या मोहित्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांनी सर्व जातीजमातींना सोबत घेऊन स्थापित केलेले रयतेचे स्वराज्य आणि त्यांचा राज्याभिषेक करण्यास विरोध करणार्या इथल्या ब्राह्मण लोकांचा, शिवाजी महाराजांवर वार करणार्या कृष्णजी कुलकर्णी या ब्राह्मणाचा विसर कसा काय पडू शकतो. पेशव्यांनी मुघल साम्राज्य नक्की कधी ‘नष्ट’ केले? पेशव्यांनी शिवाजी महाराजांच्या वारसांकडून सत्ता कशी स्वतःकडे घेतली याचा ऊहापोह इथे विस्तारभयास्तव करत नाही. इथे मराठा जातीच्या या मोहित्यांनी आपली खरी जात दाखवून दिली आहे. ब्राह्मण हे वैदिक संस्कृतीशी जोडणारा दुवा असेल, त्यांनी वैदिक ग्रंथ, परंपरा यांना वाचवले असेल त्यांनी हे केले नसते तर अन्य संस्कृतींप्रमाणे वैदिक संस्कृति सुद्धा नष्ट झाली असती, परंतु ही मानवतेला काळिमा फसणारी संस्कृति नष्टच झाली असती तर बरे झाले असते. पर्शियन,ग्रीक, इजिप्शियन,रोमन आणि इतर अनेक संस्कृति नष्ट झाल्याने तिथल्या देशांचा विकास तरी झाला. ही वैदिक संस्कृति किंवा धर्म नष्ट झाला असता तर या देशाचे भले झाले असते. या लोकांना देशाच्या रक्षणापेक्षा स्वतःची संस्कृति, ग्रंथ मोठे वाटत असतील तर त्यांना देशद्रोहीच म्हणायला पाहिजे.)
इंग्रजीत एक म्हण आहे : “To kill a snake, cut it's head off”!!!
तसेच हिंदू धर्माला मारण्यासाठी सर्व ब्राह्मणांचा प्रथम नाश करा!!!
भारतातील हिंदुविरोधी शक्तींना हे माहित आहे आणि म्हणूनच ते ४० च्या दशकापासूनच नाझींसारखे ब्राह्मणांच्या हात धुवून मागे लागले आहेत !!!
उत्तर:
(व्वा, काय योग्य अशी सापाची उपमा दिली आहे ब्राह्मणी प्रवृत्तीला. जहरी सापाला एक तर जंगलात सोडले पाहिजे किंवा त्याला ठेचून मारले पाहिजे. इथे ब्राह्मणी लोक हे मानवी मूल्यांना विरोध करणारे असल्याने ते जहरी सापासारखेच आणि हिटलरसारखेच ठरतात. तरीही त्यांना ठेचायचे कोणाच्याही मनात नाही. उलट त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय इत्यादि मानवी मूल्यांचा स्वीकार करावा हा तमाम ब्राह्मणेत्तर हिंदू बहुजन लोकांचा आग्रह आहे. हा आग्रह १९४०च्या दशकापासून होत आहे, कारण तेव्हा त्यांना आपल्या गुलामगिरीची जाणीव झाली. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्या प्रमाणे गुलामाला गुलामगिरीची जाणीव झाल्यास तो बंड केल्याशिवाय राहणार नाही. तर, असा हिटलरी, अमानवी प्रवृत्ती सोडण्याचा आग्रह करणार्यास नाझी म्हणणे म्हणजे खिसेकापूने ज्याचा खिसा कापलाय त्यालाच चोर म्हणून बदडण्यासारखे आहे. आपली ही देशाला विघटित करणारी वृत्ती ब्राह्मणांनी सोडली नाही तर पुढे मागे बहुजन समाज त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यास जबाबदार ते स्वतःच असतील.)
फक्त ब्राह्मणांनीच भूतकाळात खालच्या जातींना वाईट वागणूक दिली असं धादांत खोटं बरेच लोक पुढे रेटून बोलतात, पण ते खरं नाही.( तेथे करोना काळाप्रमाणे स्वच्छता व 'शुध्दीकरण' हा प्रमुख मुद्दा होता),आणि मी जातीभेदाला विरोध करतो !!! परंतु सर्व हिंदू,बौद्ध,जैन यांना इस्लामी राज्यकर्त्यांनी वाईट वागणूक दिली आहे याकडे सर्वांचेच जाणीव पूर्वक दुर्लक्ष आहे !!! इस्लामी आक्रमकांप्रमाणे ब्राह्मणांनी कधीही कोणाच्या विरुद्ध नरसंहार मोहिमेचे नेतृत्व केलेले नाही !!!
उत्तर:
(‘फक्त’ ब्राह्मण लोकांनीच खालच्या जातींना ‘भूतकाळात’ वाईट वागणूक दिली हे धादांत खोटे आहे असे या मोहिते यांचे म्हणणे आहे. याचा अर्थ ब्राह्मणांनी सुद्धा छळ केला असा होतो. इतरांनी देखील छळ केला असेल तर तो ब्राह्मणी व्यवस्थेस अनुसरूनच होता आणि त्याची जबाबदारी ब्राह्मणांना टाळता येणार नाही म्हणून शेवटी यास तेच जबाबदार ठरतात. आणि हे ‘भूतकाळात’ काय आहे? अजूनही तीच परिस्थिती आहे. ती बदलण्यास ब्राह्मण तयार का नाहीत? संविधान मागे सारून मनुस्मृती पुन्हा आणण्याचे प्रयत्न का होत आहेत? अस्पृश्य किंवा शुद्रांना वाईट वागणूक यामागे स्वच्छता व ‘शुद्धीकरण’ हा प्रमुख मुद्दा होता हे सांगताना या गचाळ जातीभेदचे समर्थन करताना आणि मी जातीभेदास विरोध करतो हे सांगताना या कथित मराठा मोहित्यांना लाज कशी वाटली नाही? शतकानुशतके (आणि आजही) या लोकांना गावाबाहेर ठेऊन कसली स्वच्छता राखली जात होती आणि कसले शुद्धीकरण केले जात होते. करोना सारखा कोणता जंतु संसर्ग या बहुजनांकडून होत होता? ते अस्वच्छ असतील तर त्यांना स्वच्छ व्हायला सांगायचे ना? पण त्यांना विहिरीवर पाणीही भरू द्यायचे नाही आणि अस्वच्छ आहेत म्हणून अस्पृश्य ही मानायचे, ही दुटप्पी प्रवृत्ती. इस्लामी राज्यकर्त्यांनी हिंदू, बौद्ध जैन यांना वाईट वागणूक दिली असेलही. पण स्वतःच आपल्याच धर्मातील शूद्र-अतिशुद्र यांच्यावर अत्याचार केला त्याचे काय? ब्राह्मणांनी नरसंहार मोहिमेचे नेतृत्व केले नसले (त्याची गरज नाही, कारण त्यांचे डोके अशा घटनांमगे असते) तरी शूद्र-अतिशुद्र यांना जी अमानवी वागणूक शतकानुशतके दिली ती कोणत्याही नरसंहारापेक्षा कमी नाही.)
२५००वर्षांपूर्वीच्या वैदिक काळात ब्राह्मण आणि क्षत्रिय फक्त शक्तिशाली होते !!!५०० बी.सी.मध्ये बौद्ध धर्माच्या जन्मानंतर,मतीभ्रष्ट झाल्यामुळे ईतर भारतीयांनी फक्त ब्राह्मणांचा अधिकार नाकारला ( कारण सॉफ्ट टार्गेट )आणि हळूहळू बौद्ध धर्म स्वीकारला !!!
उत्तर:
(२५०० वर्षांपूर्वी वैदिक काळात ब्राह्मण आणि क्षत्रिय फक्त शक्तीशाली होते ही कबूली सुद्धा महत्त्वाची आहे. याचा अर्थ त्या काळात सुद्धा बहुजन हे दुर्बलच ठेवले गेले होते. बौद्ध धर्माच्या जन्मानंतर तो धर्म स्वीकारणारे मतीभ्रष्ट झाले होते असा सरळ सरळ आरोप या मराठा मोहिते यांनी केला आहे. कारण का, तर त्यांनी फक्त ब्राह्मणांचा अधिकार नाकारला! त्यांचा अधिकार स्वीकारण्याची जबरदस्ती होती काय? तो नाकारला असेल तर ब्राह्मण सॉफ्ट टार्गेट होते म्हणून नव्हे तर त्यांचे अमानवी कसब लक्षात आल्याने आणि बौद्ध धर्मातील मानवतेची मूल्ये पटल्याने त्यांनी ब्राह्मणांना नाकारले असणार.)
८ व्या शतकापर्यंत बौद्ध धर्म हा बहुसंख्य धर्म होता तेव्हा ब्राह्मण असलेल्या शंकराचार्यांनीच वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले !!!
त्यानंतर केवळ २०० वर्षांनी इस्लामिक आक्रमणे सुरू झाली आणि भारत इस्लामिक राज्यकर्त्यांची वसाहत बनला !!! मुघल साम्राज्याच्या समाप्तीनंतर,ब्रिटिश वसाहतवाद्यांनी त्वरीत सर्व सत्ता ताब्यात घेतली !!!
भारतात गेली १००० वर्षे ब्राह्मण कधीच सत्तेत नव्हते !!!
सर्व राजकीय,आर्थिक आणि प्रशासकीय सत्ता इस्लामी सम्राटांच्या आणि नंतर इंग्रजांच्या हातात एकवटली!!!
उत्तर:
(बौद्ध धर्माच्या पतना नंतर दोनशे वर्षे वैदिक धर्म आणि त्यांचे राज्य असेल तर इस्लामिक आणि नंतर ब्रिटिश आक्रमणे का थोपवली गेली नाहीत? देशासाठी आपली कथित बुद्धिमत्ता वापरुन क्रांति न करता वैदिक धर्म सांभाळायला प्राथमिकता का दिली? इस्लामी आणि ब्रिटिश सत्तेची चाकरी करून ब्राह्मणांनी प्रशासकीय सत्ता स्वतः का भोगली? ब्राह्मण सत्तेत कधीच नव्हते असे म्हणत असताना, वैदिक धर्मानुसार क्षत्रिय लोकांच्या हाती सत्ता असणे हा नियम आहे आणि ब्राह्मणांच्या सल्ल्याने ते सत्ता गाजवणार हा नियम मोहिते यांना माहीत नाही काय? पाठीमागून सूत्रे हलवण्यासाठी ब्राह्मण माहिर आहेत. आजही पंतप्रधान मोदी हे ओबीसी, राष्ट्रपती या अनुसूचीत जमतीच्या पण ते कारभार करणार ब्राह्मणी संघाच्या इशार्यावर, असे चित्र आहे. तरीही हजार वर्षे सत्ता नव्हती हे रडगाणे का?)
आजच्या भारतातील बहुतांश दारिद्र्य आणि विषमता ही त्या वसाहतवाद आणि भांडवल शाहीचा परिणाम आहे !!!
मग परकीय आक्रमक आणि वसाहतवाद्यांनी निर्माण केलेल्या परिस्थितीसाठी ब्राह्मणांना का म्हणून दोषी धरले जाते?
उत्तर:
(आपण निर्माण केलेल्या अमानवी जातीव्यवस्थेच्या पापाचे खापर वसाहतवाद आणि भांडवलशाहीवर फोडायला खूपच जबरदस्त निगरगट्टपणा लागतो. वर्ण-जाती व्यवस्था, त्यावर आधारित उच्च-नीच भेदभाव ही ब्राहमण्याची देणगी आहे. विदेशी आक्रमक लोकांनी आणली यास कसलाही आधार नाही. म्हणून यासाठी आणि परिणामांसाठी तेच जबाबदार आहेत.)
सध्याच्या पिढीतील ब्राह्मणांना इतर लोकांना ब्राह्मणांबद्दल काय वाटते याची फारशी चिंता नाही कारण त्यांना स्वतःची बुद्धिमत्ता आणि व्यवसाय आहे !!!
उत्तर:
(जर सध्याच्या पिढीतील ब्राह्मणांना दुसरे काय म्हणतात याची फारशी चिंता नसेल तर हा एवढा मोठा असत्याचे गाठोडे असलेला लेख मराठ्याची जात लावून लिहायची गरज का पडली?)
ब्राह्मण भारताशिवाय संपूर्ण जगभर यशस्वी झाले आहेत !!! त्यांनी मॅसॅच्युसेट्समध्ये एक कोनाडा देखील मिळवला आहे !!! बोस्टनचे ब्राह्मण ही तर वरच्या उच्चभ्रूंना संबोधित करण्यासाठी एक लोकप्रिय म्हण आहे !!!
ते खूप यशस्वी उद्योजक आहेत !!! ते असंख्य पॅरास्टेटल्स आणि असंख्य MNCs मध्ये प्रमुख पदांवर आहेत !!! नवीन ब्राह्मण तरुण जगाच्या विविध कानाकोपऱ्यात स्थलांतर करतात आणि आपली तीव्र बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करतात !!! ब्राह्मण सदैव शांततेत राहतात आणि हिंसा टाळतात !!!
उत्तर:
(ब्राह्मण हे जगभर यशस्वी झाले असतील आणि मोठमोठ्या MNCs मध्ये प्रमुख पदांवर असतील तर आपल्या देशाच्या पैशावर शिक्षण घेऊन, आपला देश सोडून परदेशातील MNCsची चाकरी करताना त्यांना लाज वाटली पाहिजे. ही भारत देशाप्रती कृतघ्नताच नव्हे तर देशद्रोह आहे. हे लोक पूर्वी इस्लामी राजे आणि ब्रिटिशांची चाकरी करत होते, आता पाश्चात्य लोकांची चाकरी करत आहेत हेच दिसून येत आहे. परदेशी शरण जाणारी अशी तीव्र बुद्धिमत्ता आणि कौशल्य काय जाळायचे आहे? आणि दुसरे विशेष म्हणजे याच ब्राह्मण लोकांनी परदेशात जातीभेदाचा झेंडा गाडून धर्माच्या आणि देशाच्या नावाला काळिमा फासला आहे. ब्राह्मणेत्तर शेकडो लोकांचा त्यांनी जातिभेद करून छळ केला म्हणून कॅलिफोर्निया येथे जातीय भेदभावाविरोधात विधेयक पारित करण्यात आले आहे हे यांना भूषणावह वाटते आहे का?)
तेव्हा कृपया हे षडयंत्र समजून घ्या ... की, हिंदू धर्म संपवायचा असेल तर तुम्हाला फक्त ब्राह्मणांना संपवायचे आहे किंवा तटस्थ करायचे आहे....
उत्तर:
(एकीकडे ब्राह्मणांनी वैदिक धर्म जीवंत ठेवला असे म्हणायचे आणि दुसरीकडे हिंदू धर्माचा कैवार घेऊन हिंदू खतरे में अशी हाळी देऊन बहुजनांना पेटवायचे असा हा दुतोंडी प्रकार आहे. हिंदूंना संपवायला ब्राह्मणच आपल्या कर्तृत्वाने समर्थ आहेत, नव्हे त्यांची तशीच इच्छा आहे, कारण त्यांचा धर्म वैदिक आहे ब्राह्मण नव्हे.)
ही अमानुष विचारधारा जास्त करून महाराष्ट्रातच रुजवली जात आहे त्यासाठी आपणच वेळीच सजग होऊन योग्य ती काळजी घेतली पाहिजे. 🚩🚩🙏🚩
उत्तर:
(भारतात जातीयतेचे, अल्पसंख्यांक-द्वेषाचे अमानुष बीज पेरून देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान करणार्या ब्राह्मण्यवादापासून सावधान, सजग राहणे देशाच्या आणि स्वतःच्या भल्यासाठी आवश्यक आहे. तरी, देश वाचविण्यासाठी योग्य काळजी घ्या.)
-
.jpg)