पंक्चर जिहादची थापेबाजी

सोशल मिडीयावर वाचणारे सगळेच लोक मूर्ख आहेत असे गृहीत धरून पोस्ट लिहिणाऱ्या लोकांची कीव येते. सामान्य बुद्धिमत्ता असणारा आणि थोडीशी चौकसबुद्धी असणारा कुणीही माणूस या धर्मांध लोकांच्या खोट्या पोस्ट्सची पोलखोल करू शकतो.  अशीच एक पंक्चर जिहाद षडयंत्र शीर्षक असणारी पोस्ट सोशल मीडियामधून फिरत आहे. सुरुवातीला ती पोस्ट वाचा आणि नंतर त्या पोस्टमधील फोलपणा वाचा.

पंक्चर जिहाद


मूळ पोस्ट

अधिक हिंदू कुटुंबे अपघातात मरतात 🛑

   जिवंत राहायचे आहे

 केवळ 450 ते 1500 रुपये खर्च करून

 कारमध्ये टायर 12V पोर्टव्हल पंप ठेवा!

 *टायरमधील हवा 30 ते 35PSI असावी*

 *ते ६० ते ६५ PSI भरतात*!

 *👺 पंक्चर जिहाद षडयंत्र *

 *🛑काळजी घ्या❗*

 *एक षडयंत्र जे कोणालाच समजले नाही, फक्त बळी ठरला*

   *बांधवांनो, हायवेवर चालणारे वाहन झाडाला कसे धडकते याचा विचार केला आहे का*??

 *संपूर्ण कुटुंबाने भरलेली कार चालताना कशी उलटते किंवा कारला धडकून अपघात होतो आणि संपूर्ण कुटुंब झोपी जाते*?

  ड्रायव्हरला कसे चालवायचे ते माहित नव्हते का? तो नवीन ड्रायव्हर होता का?

  नाही .

 आज तुम्ही कोणताही पेपर उचला आणि वाचा, तिथे गाडीत किती जण मेले, तिथं त्याच्या धडकेत 3 मेले, रोज 10 बातम्या आल्या.

 ते फक्त या लोकांचे आहे.

 हे का घडले आणि ते का होत आहे माहित आहे का???

 *मृत्यू झालेल्या 100 पैकी 95 लोक हिंदू धर्माचे आहेत* कोणी वाढदिवस साजरा करणार होते, कोणी कुठेतरी भेट देणार होते, कोणी वधूला घेऊन जाणार होते, आनंदाचे वातावरण क्षणात दुःखात कसे बदलते? ?????

 मी तुम्हाला सांगतो, ज्याला रस्त्याच्या कडेला असलेल्या पंक्चरच्या मुलाच्या दुकानातून त्याच्या गाडीत हवा येते, तो तुम्हाला गाडीतून उतरूही देत ​​नाही आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून 20-30 लाखांच्या कारमध्ये हवा भरता. भरलेल्या *30 ते 35 PSI तुमच्या गाडीच्या टायरमध्ये हवेत येतात, ते 60 ते 65 PSI भरतात* आता तुम्ही किती श्रीमंत आहात हे सांगताना दोन बोटांच्या मध्ये एक नोट ठेऊन विचारा किती आहे.

 तेही मोठ्या प्रेमाने सर, तुम्ही आनंदाने वीस रुपये दिले आणि निघून गेला.  भाऊ, त्याने त्याचे काम केले.

  *१- आता तुम्ही वेगाने चाललात तर तुमची गाडी वळण घेताना घसरेल, असंतुलित झाल्यावर उलटेल.

 *२- तुम्ही कुठेतरी इमर्जन्सी ब्रेक लावला तर तो घसरून समोरच्या व्यक्तीवर (जसे प्राणी, मोटारसायकल, बस, ट्रक, कार, पूल, झाड) आदळला जाईल आणि तुम्ही वाचू शकणार नाही!

  *आणि जर तुम्ही कधी हवा जास्त फुगवताना पकडली तर समोरची व्यक्ती म्हणेल, सर, जास्त हवा ठेवल्याने गाडी चांगली एव्हरेज देते आणि तुम्ही त्याच्या बोलण्यात उतरता*.

 तुम्ही दिलेले 20 रुपये तुमचे 20 लाख काढून घेतात.

 वाचलात तर दवाखान्यात जा आणि गाडी लावायची असेल तर हे लोक सुद्धा दुरुस्त करतील.

  वीस रुपयात किती मोठं षडयंत्र घडतंय विचार करा

 हे लोक तुम्हाला प्रत्येक रस्त्यावर 5-10 किलोमीटरवर सापडतील, ते पैसे कमावतात का?

 होय, कमाईसोबतच ते तुम्हाला भिकारी बनवून मृत्यूची झोप देत आहेत.

*हिंदू बांधवा वाचवा या षडयंत्रापासून वाचवा*

 *तुमच्या वाहनात नेहमी 12V पोर्टेबल टायर एअर पंप ठेवा, जे आवश्यक असल्यास 5 मिनिटांत आपोआप हवा भरेल*

  तेही तुमच्या टायरच्या गरजेइतके.

 तुमच्या वाहनाचा डिजिटल हवेचा दाब देखील सांगेल आणि तुमच्या टायरचे आयुष्य देखील वाढवेल.

 *जर तुम्हाला ५ लाखांची कार घेता येत असेल तर १५०० रुपयांचा टायर प्रेशर पंप का नाही*.

 त्यांचे प्रेशर मीटर सुद्धा चुकीचे सांगतात, जेव्हा प्रेशर 50 असेल तेव्हा मीटर त्यांना 35 ला सांगतो, कृपया तुमचे स्वतःचे प्रेशर मीटर वाहनात ठेवा, ते 300 ₹ 400 ला येते.

 यासोबतच जर तुम्ही 250 रुपये किमतीचे पंक्चर किट ठेवले तर तुम्ही पंक्चर जिहादींपासून कायमचे सुरक्षित राहाल.

 *तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या सर्व नंबरवर मेसेज पाठवा, सर्वांचे प्राण वाचतील*


या  खोटारड्या पोस्टची तपासणी

     सर्वसामान्य लोक कोणत्याही लेखामध्ये दिलेला data सहसा तपासून बघत नाहीत. किंबहुना data कसा तपासून बघायचा हेच अनेकांना माहित नसते. त्यामुळे ते लेखामध्ये जी माहिती दिलेली आहे तीच खरी मानून बसतात. याचाच फायदा फेक फॅक्टरी चालवणाऱ्या लोकांनी घेतलेला आहे. त्यांनी सोशल मिडीयावर खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट्सचा रतीबच घालायला सुरुवात केली आहे. अशीच एक पोस्ट म्हणजे 'पंक्चर जिहाद'ची थियरी मांडणारी ही पोस्ट. तर आता त्यातील खोटेपणा उघड करूया.

केंद्र सरकारचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय दरवर्षी देशभरात झालेल्या अपघातांची नोंद ठेवत असते. आणि दरवर्षी त्याचा अहवाल प्रसिद्ध करत असते. या मंत्रालयाने अपघातांमध्ये मरण पावलेल्या लोकांची धर्मवार माहिती कधीच एकत्रित केली नाही आणि अर्थातच ती कधी प्रसिद्ध केली नाही. या मंत्रालयाने २०२२ या वर्षात झालेल्या अपघातांचा अहवाल https://morth.nic.in/sites/default/files/RA_2022_30_Oct.pdf या लिंकवर प्रसिद्ध केलेला आहे. आपण तो पाहू शकता. यात अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचीही माहिती दिलेली आहे. यात मृतांच्या संख्येची  अनेक प्रकारे विभागणी दिलेली आहे. परंतु मृतांच्या धर्मानुसार विभागणी कुठेही दिलेली नाही. असे असताना पंक्चर जिहादच्या पोस्टमध्ये मृत्यू झालेल्या १०० पैकी ९५ लोक हिंदू धर्माचे आहेत असे  कोणत्या आधारावर म्हटले आहे?  ही पूर्णपणे खोटी माहिती आहे.  

दुसरी गोष्ट रस्त्याच्या कडेला असलेली पंक्चरची दुकाने कुणाची आहेत? ती केवळ 'त्या'च लोकांची नाहीत. तिथे शीख, हिंदू, मुस्लीम, बौद्ध, जैन असे सगळ्याच  धर्माचे लोक आहेत. हे तुम्ही स्वतः तपासू शकता. ही संख्या लोकसंख्येवर अवलंबून असते. ज्या भागात हिंदू लोक जास्त राहतात त्या भागात हिंदू लोकांची दुकाने आढळतील. ज्या भागात मुस्लीम लोक जास्त राहतात त्या भागात मुस्लीम लोकांची दुकाने जास्त आढळतील. पण पोस्टमध्ये मात्र केवळ 'त्या'च लोकांची दुकाने असल्याचे म्हटले आहे. थोडक्यात काय? तर ही पोस्टसुद्धा धर्मांधांच्या फेक फॅक्टरी तून बाहेर पडलेली खोटारडी पोस्ट आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने