कुठल्यातरी गुन्ह्याचा व्हिडीओ घ्यायचा. त्याला मुस्लिमांचे नाव जोडायचे आणि मुस्लिमांना बदनाम करायचे ही हिंदुत्ववाद्यांची सोशल मिडीयाच्या जमान्यातली स्ट्रॅटेजी आहे. असाच एक व्हिडीओ आणि त्यासोबत दिशाभूल करणारा मजकूर सोशल मीडियातून पसरवला जात आहे. त्या व्हिडीओचा भांडाफोड इथे केलेला आहे. आधी मूळ पोस्ट वाचा आणि व्हिडीओ पहा.
मूळ पोस्ट
कोल्हापूर जिल्ह्यातील निपाणी गावामध्ये मुसलमानाने प्रत्येक माशाच्या पोटात किडन्या खराब करणाऱ्या गोळ्या ठेवल्या... आणि हे मासे तो दररोज हिंदूंना विकायचा पण अखेर घडा भरला आणि त्याचे पाप समोर आले. 🐷🐷 याच्यामुळेच आम्ही म्हणतो त्यांच्याकडून काहीच खरेदी करू नका👏🏼
उत्तराची पोस्ट
हा व्हीडीओ महाराष्ट्रातला नाही. पोलिसांच्या खांद्यावरील टॅग बघा, KMS असा आहे. निळ्या शर्ट वाल्याच्या गळ्यातील icard पट्ट्यावर LSGD ही अक्षरे दिसत आहेत. ती केरळच्या Local Self Government Departmentची असावीत असे गूगल सर्च मध्ये दिसते.
हा कोझिकोड येथील फोटो आहे. त्या पोलिस अधिकार्याच्या खांद्यावरील टॅग आणि वरील व्हीडीओ मधील टॅगवर KMS असाच बिल्ला आहे.
त्या गोळ्या अमोनिया फोर्मलीन टॅब्लेट आहेत. माशांना चार पाच दिवस फ्रेश ठेवण्यासाठी त्या गोळ्या माशांच्या कल्ल्यामध्ये मासे विक्रेते घालून ठेवतात. त्या विरघळून मशाच्या शरीरात पसरतात म्हणून मासे फ्रेश राहतात. अशा माशांचे नियमित सेवन केल्यास किडनीचे विकार होतात.
मासे विक्रेते या गोळ्या किडण्या खराब करण्यासाठी नव्हे तर मासे फ्रेश राहण्यासाठी टाकतात. व्हीडीओ मधील विक्रेता कोणत्या धर्माचा आहे ते काही स्पष्ट दिसत नाही.
विशेष म्हणजे याबाबतच्या जनजागृतीसाठी एका मुसलमानानेच हा व्हिडीओ फेसबुकवर टाकला आहे. त्याची लिंक- https://www.facebook.com/watch/?v=1214866329645629
पण विकृत हिंदुत्ववादी त्याचा कसा अनर्थ करीत आहेत बघा.
बाय द वे, निपाणी कोल्हापुरात नाही बेळगाव जिल्ह्यात आहे.

